विदर्भ

मुख्यमंत्री पद ५० आमदारांच्या भरवशावर मिळवलं; खोक्याच्या ‘त्या’ घोषणाबाजीवर संजय गायकवाडांचे प्रत्युत्तर

अमृता चौगुले

बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवना समोर शिवसेनेच्या शिंदे गटाला लक्ष्य करत'आले रे आले,गद्दार आले' व 'पन्नास खोके एकदम ओके'अशा नारेबाजीतून जोरदार टिकास्त्र सोडले होते.

'त्या' नारेबाजीवर बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. आ.गायकवाड बुलडाणा येथे त्यांच्या कार्यालयात बोलतांना म्हणाले, अजित पवारांनी भल्या पहाटे परस्पर 'शपथ' घेऊन आपल्या काकांशीच गद्दारी केली होती. तर धनंजय यांची लफडी टि.व्ही.च्या माध्यमातून समोर आली आहेत. अशांनी आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार? असा सवाल केला.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, राहिला 'खोक्या'चा विषय तर आम्ही पन्नास आमदारांच्या भरवशावर मुख्यमंत्रीपद मिळवले आहे.आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही आणि घेतले पण नाहीत अशी प्रतिक्रिया देत आमदार गायकवाड यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT