पालकमंत्री संजय राठोड  
वाशिम

पंतप्रधानांच्या हस्ते ५ ऑक्टोंबरला पोहरादेवीत नंगारा भवनाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा म्युझियमचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबरला आयोजित केला होता. मात्र, त्यांचा पोहदेवीचा दौरा आता नवरात्र उत्सवात ५ ऑक्टोंबरला होणार आहे. ५ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नंगारा भवनाचे लोकार्पण होईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरूवारी (दि.२०) पोहरादेवीत पत्रकार परिषद घेऊन दिली.

पुढे बोलताना राठोड म्हणाले, पोहरादेवीत बंजारा विरासत नंगारा म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. आता दौऱ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून २६ सप्टेंबर ऐवजी नवरात्रोत्सवात ५ ऑक्टोंबरला येणार आहेत. देवी जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यावर बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण करून सभास्थळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत, अशीही माहिती पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज, पराग पिंगळे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT