आजपासून बसपाची संविधान जागरण रॅली  Pudhari Photo
नागपूर

नागपूर | आजपासून बसपाची संविधान जागरण रॅली 

मोनिका क्षीरसागर

नागपूर: भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने भारतीय संविधान व आरक्षणावर देशभर उलट सुलट चर्चा होत आहेत. अशा वेळी बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने संविधान व आरक्षण मागील भूमिका तसेच शत्रुपक्ष व मित्रपक्ष समजून सांगण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या वतीने 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर पर्यंत "दीक्षाभूमी ते चैत्यभूमी" राज्यस्तरीय संविधान जागरण रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी  पत्र परिषदेत दिली. 

ही संविधान रॅली सोमवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीला अभिवादन करून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती करत कांशीरामजी यांच्या स्मृती दिनी 9 आक्टोंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर पोहोचून बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर धारावी परिसरात या रॅलीचा समारोप होईल. 

या रॅलीचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे करणार असून मुख्य मार्गदर्शक बसपाचे केंद्रीय नेते व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी माजी खा डॉक्टर अशोक सिद्धार्थ हे आहेत. यावेळी प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, महिला आघाडी प्रमुख सुनंदाताई नितनवरे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने  प्रामुख्याने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT