नागपूर : कोल्ड सिरपमुळे आणखी मध्यप्रदेशातील आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू झाला असून 16 बालके मध्यप्रदेशातील आहेत. अजूनही अनेक अत्यवस्थ मुलांवर नागपुरातील एम्स, मेडिकल आणि काही खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
व्हेंटिलेटरवर असलेल्या मुलांच्या नातेवाईकांची गुरुवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एम्स आणि मेडिकल रुग्णालयात भेट घेतली. या मुलांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. संबंधित अधिकारी नागपुरात तळ ठोकून आहेत. मध्यप्रदेश सरकारने आतापर्यंत हयगय केल्याप्रकरणी वैद्यकीय सेवेतील दोघांना निलंबित केले आहे. तमिळनाडू सरकार या कफ सिरप प्रकरणी चौकशीत सहकार्य करीत नसल्याची नाराजी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बोलून दाखविली.