आमदार नितेश राणे File Photo
नागपूर

नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गटाची विमानतळावर घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने उलट सुलट विधाने करणाऱ्या भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या विरोधात रविवारी (दि.२९) नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीवर बोलताना आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यात आता तेवढा जीव राहिलेला नाही, असे टीकास्त्र सोडले.

आज नागपूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपात काँग्रेस शिवसेनेत मोठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेसचे नेते खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी हॉटेल रेडिसन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यावर दडपण असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गट विदर्भात विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागांसाठी आग्रही असल्याची भूमिका विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी मांडल्यानंतर महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढली आहे. त्यामुळे आज स्वतः उद्धव ठाकरे जाहीर सभेत काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT