नागपूर: विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले असून, शेतकरी (Farmers) मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे पिकाची कापणी सुरू असताना, हाताशी आलेले धान, कापूस आणि सोयाबीन पीक (Paddy, Cotton, Soybean) या अवकाळीमुळे धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन सरकारने पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत (Government Aid) जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा 'अलर्ट' (Rain Alert) असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अजून वाढण्याची भीती आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे पिकाचा दर्जा घसरल्याने (Crop Quality) शेतकऱ्यांना योग्य भावही मिळणार नाही, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
गृह विभागाच्या कारभारावर हल्लाबोल
यावेळी वडेट्टीवार यांनी गृहविभागाच्या (Home Department) कारभारावर सडकून टीका केली. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलिस निर्ढावलेले आहेत. त्यांना पाठीशी घातले जात असल्याने सामान्य माणूस तक्रारही करू शकत नाही, अशी स्थिती राज्यात असताना न्याय कसा मिळणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
फलटण प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी
फलटण (Phaltan Case) प्रकरणाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी मागणी केली की, कोणत्याही पक्षाचा नेता किंवा त्यांची माणसे असू देत, महिला डॉक्टरच्या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे किंवा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या प्रत्येकावर कठोर कारवाई (Action) झाली पाहिजे.