नागपूर : वर्चस्वाच्या लढाईत दगडाने ठेचून खून  File Photo
नागपूर

नागपूर : वर्चस्वाच्या लढाईत दगडाने ठेचून खून

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

वर्चस्वाच्या लढाईत धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर दगडाने ठेचून एका गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृतकाचे नाव विकेश सुखदेव जाधव (वय 38 वर्षे) राहणार भीम चौक हिवरेनगर असे असून, निखिल उर्फ डंबा मनोहर वासनिक (वय 24) पडवळनगर झोपडपट्टी, नितीन इंगळे कुंभार टोली, प्रभाकर गोपाल चौधरी भांडेवाडी व आकाश नागरीकर नागेश्वर नगर अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, विकेश विरुद्ध खून, मारहाण, सशस्त्र हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल विरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायदा दरोड्याच्या तयारीचे गुन्हे दाखल आहेत. जुलै 2019 मध्ये निखिल विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

साथीदारही अट्टल गुन्हेगार आहेत. गेल्या अनेक दिवसात निखिल व विकेशमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती. दगडाने डोके ठेचून विकेशचा खून करण्यात आला. मारेकरी पसार झाले. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. नंदनवन पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT