पारडी परिसरातील ९ वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. file photo
नागपूर

नागपूर हादरले : पारडी येथे अल्पवयीन मुलीवर बहिणीसमोर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: पारडी परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोरच एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. रविवारी (दि. १५) ही घटना घडली. दोन दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आरोपीस लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या पीडित मुलीचे आई- वडील रोजंदारी कामावर जातात. नेमकी हीच संधी साधून किंबहुना त्याला हे माहीत असल्याने त्याने हा डाव साधल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कुणाला काहीही सांगू नको, असे म्हणून त्याने या चिमुकलीच्या हाती वीस रुपयाची नोट दिली. त्या मुलीने घरी आई-वडील आल्यानंतर झालेला सर्व प्रकार सांगितला. लहान बहिणीनेही यास दुजोरा दिल्यानंतर अखेर पारडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

वैद्यकीय तपासणीत या मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या मुलींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. आरोपी या मुलींच्या संपर्कातील असावा व घरी कोणीही राहत नाही, हे त्याला माहीत असावे, असा पोलिसांचा कयास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT