नागपूर- दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.  (File Photo)
नागपूर

Nagpur News | वर्चस्वाच्या लढाईत एकाचा दगडाने ठेचून खून, ४ जण अटकेत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

वर्चस्वाच्या लढाईत धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर दगडाने ठेचून खून प्रकरणी फरार असलेल्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Nagpur News)

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडोलेनगर परिसरात घडलेल्या या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव विकेश सुखदेव जाधव (वय ३८, रा. भीम चौक हिवरे नगर) असे आहे. तर निखिल उर्फ डंबा मनोहर वासनिक (२४), प्रभाकर गोपाल चौधरी (२४), आकाश नागरीकर (२७), शुभम चुनोडे (२९) अशी संशयितांची नावे आहेत. विकेश मला मारणार असल्याने मी त्याला संपविल्याचे निखिलने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकेश विरोधात खून, मारहाण, सशस्त्र हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल याच्यावर शस्त्र प्रतिबंधक कायदा, दरोडाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. जुलै २०१९ मध्ये निखिल विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्याचे साथीदारही अट्टल गुन्हेगार आहेत. गेल्या अनेक दिवसात निखिल आणि विकेशमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती. दगडाने डोके ठेचून विकेशचा खून करण्यात आला होता. त्याचा खून करुन संशयित पसार झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT