सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे विनयभंगाची घटना समोर आली आहे.  file photo
गोंदिया

घरावर माकडे आल्याचे सांगून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा तिच्या शेजारी राहणाऱ्या ६१ वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. २४) सकाळी १० च्या सुमारास घडली. सुरेश हरणे (वय ६१, रा. सौंदड) या संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही सौंदड येथे एका शाळेत शिक्षण घेत आहे. ती सुरेश हरणे याच्या घराशेजारील भाड्याच्या घरात राहते. घटनेवेळी घरावर माकडं आली असल्याचे सांगून त्यांना हाकलून लावण्याच्या बहाण्याने हरणे याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी ही एकटी असल्याचे पाहून तिच्याशी त्याने अश्लील चाळे केले व तिची छेड काढून विनयभंग केला. यावेळी पीडितेने आरडा-ओरड केल्याने हरणे याने त्याठिकाणाहून पळ काढला.

दरम्यान, मुलीने डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपी सुरेश हरणे याच्या विरोधात पोस्को कलम ८ अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बांबोडे करीत आहेत.

आरोपीला न्यायालयीन कोठडी

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून आरोपी सुरेश हरणे यास गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले आसता न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, आरोपीची भंडारा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT