चंद्रपूर : अवैधरित्या गोवंश वाहतूक करून ती कत्तलीसाठी तेलंगानाकडे नेणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध उमरी पोतदार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी २५ जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच दोन पिकअप वाहने व चार मोबाईल हँडसेटसह एकूण १८,९५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डोंगरहळदी रोड परिसरात 11 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे करण्यात आली.
पोलीस स्टेशन उमरी पोतदार यांना पहाटे गुप्त माहिती मिळाली की, दोन पिकअप वाहनांतून गोवंश तस्करी केली जात आहे. पोलिसांनी तात्काळ डोंगरहळदी रोडवर पंचासह नाकाबंदी केली. दोन्ही वाहन संशयास्पदरीत्या आल्याने थांबवून तपासणी केली असता, २५ गोवंश जनावरे आढळली.
या प्रकरणी आरोपी मंगेश शामराव चौधरी (वय २८, रा. लक्कडकोट), राजेश गजानन घोगरे (वय २७, रा. बेंबाळ), मोहम्मद अजीज अली (वय २४, रा. वाकडी), मिर्झा अजीज बेग (वय २२, रा. वाकडी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा बोलेरो पिकअप, महिंद्रा बोलेरो पिकअप, २५ नग जनावर व चार मोबाईल हँडसेट जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, पो. ह. सुभाष राऊत, पोअं. सतीश झाडे, पोअं. विनोद चौधरी, पोअं. राहुल शंखावार, पोअं. सुरज बुजाडे, पोअं. दिनेश देवाडे व पोअं. गोपाल घुमडेवाड यांनी मिळून केली.