चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल  (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Cancer Hospital |चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज : २२ डिसेंबररोजी सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur cancer hospital inauguration

चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साकारलेले चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर  2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.

चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय. 2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. 

 जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे.

कॅन्सर हॉस्पिटलची वैशिष्ट्ये -

तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री : यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators), ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग : यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा : सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे.

या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण सर संघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते  22 डिसेंबर होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

आ. मुनगंटीवार पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. आरोग्य सेवेचे नवे मानदंड जिल्ह्यात निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेले हे कॅन्सर रुग्णालय रुग्णसेवेचे प्रशस्त दालन ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT