अपघातातील दोन वाहनांचे झालेले नुकसान Pudhari Photo
बुलढाणा

बुलढाणा : एसटी दुचाकीचा भीषण अपघात; दोघे ठार, एक जखमी

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : पाठीमागून भरधाव आलेल्या एस.टी.बसची धडक लागल्याने ट्रिपलसीट दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.23) आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. राजू भीमराव खोलकडे(३५), नंदू भगवान सगट(३०) या दोघांचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर मदन जानोळकर (३४)हा गंभीर जखमी झाला.

या घटनेची अधिक माहिती अशी की, चिखली-देऊळगावराजा चौपदरी महामार्गावर मेरा खुर्द चौकीजवळ सोमवारी (दि.23) दुपारी छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जात असलेल्या एसटी बस क्रमांक एमएच १४ केक्यू ४९६७ ची समोरील दुचाकी क्रमांक एमएच.२८ एए ४१६२ ला धडक लागली. या धडकेने दुचाकीवरील तीघेही मार्गाच्या कडेलगतच्या शेतात फेकले गेले.यातहे तीघेही दुचाकीने त्यांच्या गावी केळवद (ता.चिखली) कडे दुचाकीने जात होते. या अपघाताची माहिती कळताच अंढेरा चे ठाणेदार विकास पाटील व पोलीस सहका-यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत केली.गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर जानोळकर यांचेवर चिखली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT