विदर्भ

भंडारा : वन अधिका-यांवर हल्ला, गावक-यांवर गुन्हे दाखल : खातखेडा येथील घटना

रणजित गायकवाड

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील खातखेडा गावातील नागरीकांनी वन अधिका-यांसह अन्य कर्मचा-यांना मारहाण करून जखमी केल्याचे समोर आले आहे. या याप्रकरणी पवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गावक-यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. खातखेडातील एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केल्यामुळे संतप्त गावक-यांनी मारहाण केल्याचे समजते आहे.

फिर्यादी बीट रक्षक संगीता प्रभाकर घुगे (वय २८, रा. गुडेगाव) यांच्या तक्रारीवरून मुन्ना तिघरे (रा. रेवणी), सितकुरा काटेखाये, रवी खाटकर, राजकुमार काटेखाये, युवराज मोटघरे (सर्व रा. खातखेडा) व इतर १०० हून अधिक नागरीकांविरोधात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारीदरम्यान तक्रारकर्त्यास व वन कर्मचा-यांना धमकी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

गावक-यांच्या मारहाणीत सहाययक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपाल एस. डी. गुप्ता, वनपाल डी. एस. वावरे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेकडून वनअधिकारी व कर्मचा-यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. संशयीतांना दोन दिवसाच्या आत अटक करण्यात यावी तसेच घटनेचे साक्षीदार असलेल्या कर्मचा-यांची साक्ष तात्काळ नोंदविण्यात यावी, प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, वन कर्मचा-यांना आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात यावा, गुन्ह्याची चौकशी जलदगतीने करून आरोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात करण्यात यावे, या मागणीचे निवेदन पवनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT