चहा पिण्यासाठी गेलेल्या वृद्धास ट्रकने चिरडले  Pudhari Photo
अमरावती

चहा पिण्यासाठी गेलेल्या वृद्धास ट्रकने चिरडले

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: दर्यापूर शहराबाहेर असलेल्या बाभळी टी पॉईंट अपघात घडला. या अपघतात चहा पिण्यासाठी गेलेल्या वृद्धाला ट्रकने चिरडल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. अपघात होताच ट्रक चालक व वाहक दोघेही घटना स्थळावर ट्रक सोडून पळून गेले. यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. रमेश शामराव वानखडे (वय ६०,रा.सिद्धार्थ नगर,बाभळी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

रमेश हे बाभळी येथील टी पॉईंटवर चहा पिण्यासाठी हॉटेल मध्ये गेले होते. चहा पिऊन झाल्यावर ते घरी जात होते. दरम्यान रस्ता ओलांडत असताना रमेश वानखडे यांच्या पाठीमागून अकोला ते अंजनगाव दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी २७५०) हा येत होता. याच ट्रकच्या मागील चाकामध्ये आल्याने त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक व वाहक हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाले.

ट्रक चालक व वाहकास पकडण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली होती मात्र त्यात यश आले नाही. यावेळी परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून अपघातातील ट्रक ताब्यात घेतला. दर्यापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून वानखडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठविण्यात आला. मृतक रमेश वानखडे हे अगदी गरीब कुटुंबातील आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT