वडील आणि मुलामध्ये झालेला किरकोळ वाद इतका टोकाला गेला की वडिलांनी मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे Pudhari News Network
अमरावती

अमरावती : किरकोळ वादातून पित्याने केली मुलाची हत्या

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : वडील आणि मुलामध्ये झालेला किरकोळ वाद इतका टोकाला गेला की वडिलांनी मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. ही घटना अमरावतीत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लुंबिनी नगरात मंगळवारी (दि. 3) दुपारी तीनच्या दरम्यान घडली. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी वडिलाला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पांडुरंग काकडे (वय 40) असे मृत मुलाचे नाव असून पांडुरंग रामकृष्ण काकडे (वय 61) असे हत्या करणाऱ्या आरोपी वडिलाचे नाव आहे. राहुल व वडील पांडुरंग यांच्यामध्ये घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन वडिलांनी राहुलची सत्तुर मारून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांसह सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी वडील पांडुरंग काकडे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.

माहितीनुसार वडील सेक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यांचा मुलगा नेहमी घरीच राहायचा. वडील घरी आल्यानंतर मुलासोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की वडिलांनी रागाच्या भरात घरातील सत्तुर काढत मुलावर वार केले. या घटनेनंतर जखमी मुलगा राहुल याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT