अकोला शहरासह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.  File Photo
अकोला

अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांत भीती

पुढारी वृत्तसेवा

अकोला : पुढारी वृत्तसेवा : अकोला शहरासह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (दि. १०) सकाळी ७.१४ च्या सुमारास नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला शहरात काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात होता. तिथे भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. अकोला येथील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवल्याबाबत माहिती असून कोणतेही नुकसान नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT