नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भीमडोंगरी pudhari news network
ठाणे

ठाणे : नालासोपारा शिर्डीनगर भीमडोंगरीत दरड कोसळली

पुढारी वृत्तसेवा

विरार : नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भीमडोंगरी या ठिकाणी बुधवारी (दि.25) रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिक आणि पालिका प्रशासन अग्निशमन जवान यांच्या मदतीने मुख्य रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा बाजूला केला. सदर ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. परतीच्या पावसात घडलेली ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

पालघर जिल्ह्यात बुधवारी (दि.25) सकाळपासूनच अती मुसळधार पाऊस पडत होता. परतीच्या पावसामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचले होते. यातच नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर भीम डोंगरी या ठिकाणी अचानक दरड कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली झाली नसली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई विरार शहरात 15 ठिकाणी दरड कोसळण्याची ठिकाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली होती. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांच्या माध्यमातून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डी प्रभागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बैठ्या चाळींचे निर्माण झाले आहे. दीड हजाराहून अधिक नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. दोन वर्षांपूर्वी देखील वसईच्या वागरल पाडा या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये आठ ते नऊ लोकांना आपला नाहक जीव गमावा लागला होता. रात्री अचानक घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक एकत्रित येत आपापल्या घरातील व्यक्तींची सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर आलेला मातीचा मलमा बाजूला केला अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जयेश कदम यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT