गुजरात दहशतवादविरोधी पथकाने भिवंडी शहरात कारवाई करत 800 कोटी रुपये किमतीचा एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे.  Pudhari File Photo
ठाणे

Thane| भिवंडीत 800 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त; गुजरात एटीएसची कारवाई; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वी भिवंडी शहरात कारवाई करत 800 कोटी रुपये किमतीचा 792 किलो लिक्विड एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. यावेळी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल अशा दोघाजणांना अटक करण्यात आली आहे.

पलसाना, सुरतच्या हद्दीतील करेली गावातील कारवाई दरम्यान भिवंडी शहरातील नदी नाका येथील फरीद मंजिल या इमारतीमध्ये हा साठा असल्याची माहिती मिळाल्यावर गुजरात एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे कारवाईबाबत दोन दिवस उलटले तरी स्थानिक पोलिसांना या कारवाईबाबत व ठिकाणाबाबत काहीही माहिती नसल्याचे समजते.

येथील सात मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एक फ्लॅट मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांनी भाड्याने घेतला होता. परंतु हे दोघेही तेथे न राहता कधी कधी त्या फ्लॅटवर येत होते. या इमारतीचे मूळ जमीन मालक मुसद्दीक इस्माईल फरीद यांनी 28 जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर उभे असताना आरोपी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोघांना 50 किलोच्या 5 ते 6 ड्रम मध्ये पावडर घेऊन येत असताना पाहिले होते. त्यावेळी या दोघांना मुसद्दीक इस्माईल फरीद यांनी विचारले असता या दोघांनी ड्रममध्ये कॉस्टिक सोडा असल्याचे सांगितले. परंतु ड्रम घेऊन या दोघांसोबत आलेले हमाल हे टापटीप कपडे घातलेले असल्यामुळे फरीद यांना या दोघांवर संशय आला होता. दरम्यान गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात येऊ न 800 कोटींचा एमडी साठा जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT