ठाणे : पिढ्या कितीही डिजिटल झाल्या तरी लग्न ॲरेंज असो की लव्ह मॅरेज असो हजारो जण मुहूर्त पाहूनच बोहल्यावर चढतात. मात्र यंदा नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ मध्ये बोटावर मोजण्याइतके मुहूर्त आहेत.
नव्या वर्षाच्या आरंभाला जानेवारीत तर एकही लग्राची तारीख नाही, फेब्रुवारी ते जुलै २०२६ मध्ये लग्नविधीसाठी मुहूर्त असले तरी त्यानंतर चार्तुमास, पितृपक्ष आणि नंतर येणाऱ्या सिंहस्थामुळे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात लग्राचे मुहूर्त नाहीत, त्यामुळे बोहल्यावर चढू इच्छिणाऱ्यांनी आत्ताच घाई गेली तर पुढच्या ६ महिन्यांतले मुहूर्त हाती लागणार आहेत.
दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की लगीनघाई सुरू होते. त्यामुळे लग्न जुळलेल्या घरांमध्ये सनई-चौघडे वाजू लागतात. यंदा मात्र दिवाळीनंतर नोव्हेंबर २०२५ या महिन्यात केवळ २३, २५ आणि २६, २७, ३० नोव्हेंबर एवढचे ५ मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये २ आणि ५ याच दोन तारखा आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभाला म्हणजे जानेवारीत एकही विवाह मुहूर्त नाही. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो, त्यामुळे तरुणाईचा फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधण्याकडे कल वाढला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये विवाहाचे तब्बल १० मुहूर्त आहेत. मार्चमध्ये ७, एप्रिलमध्ये ६, मे८, तर जून आणि जुलैमध्ये अनुक्रमे ५ आणि ७ मुहूर्त आहेत.
विवाह मुहूर्त असे ...
नोव्हेंबर २०२५: दि.२३,२५,२६,२७, ३०.
डिसेंबर २०२५: दि. २,५
जाने. २०२६ : मुहूर्त नाहीत
फेब्रुवारी २०२६ : दि.३,५,६,७,८,१०,११,२०,२५,२६
मार्च २०२६ : दि.५,७,८,१२,१४,१५,१६
एप्रिल २०२६: दि.२१,२६,२८,२९,३०
मे २०२६ : दि.१,३,६,७,८,९,१०,१३,१४
जून २०२६ : दि. १९,२०,२३,२४,२७
जुलै २०२६ : दि.१,२,३,४,८,९,११
ऑगस्ट ते डिसेंबर २०२६० विवाह मुहूर्त नाहीत अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
पुढील वर्षी जानेवारी २०२६ मध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत, तर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत चार्तुमास, पितृपक्ष आणि सिंहस्थ यामुळे विवाह मुहूर्त नाहीत.दा. कृ. सोमण पंचांगकर्ते