डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा भागात असलेल्या साई चौकात गरबा पाहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मंगळवारी (दि.9) विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. हा मुलगा तेथील ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला होता. विजेच्या तीव्र झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कमलकाकर खंडू नवाळे (वय.15, रा. खडकपाडा) असे मृत मुलाचे नाव आहे.
नवाळे दहाव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. गरबा सुरू असताना ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर कमलाकर चढला. मात्र खाली उतरत असताना तोल गेल्याने त्याचा ट्रान्सफार्मरच्या वायरला हात लागला. हाय व्होल्टेजशी संपर्क झाल्याने कमलकाकरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला गरबा आयोजक जबाबदार असून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.