मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन दिवसांत ८० लाख पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. CM Eknath Shinde File Photo
ठाणे

Eknath Shinde | राज्याच्या कानाकोपऱ्यात ७ तासात पोहोचता येणार : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : विकासाच्या कामांमध्ये आपण स्पीड ब्रेकर टाकणारे नसून स्पीड ब्रेकर काढून विकासाला चालना देणारे आपले सरकार असल्याने महाराष्ट्र पुन्हा देशात पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक, उद्योग, जीडीपी तसेच कल्याणकारी योजना राबविण्यामध्ये देशाचे पॉवर हाऊस असलेले महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. राज्यभरात जवळपास ५ हजार किलो मीटरचे रोड तयार होत असल्याने आगामी काळात राज्यातील कुठल्याही ठिकाणी नागरिकाला जायचे असेल तर केवळ सहा सात तासांमध्ये माणूस पोहचेल, अशा प्रकारची कामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून मुंबई- ठाणेकरांना सध्या ४० मिनिटात मुंबई ते ठाणे- घोडबंदर रोडपर्यंत पोहचता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

नीती आयोगाच्या अहवालानुसार एम.एम. आर. जागतिक आर्थिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने एमएमआर क्षेत्रांमध्ये सर्वांसाठी घरे, माहिती व तंत्रज्ञान, उद्योग ४.०, पर्यावरण, आणि रोजगार निर्मिती या प्रमुख पाच क्षेत्रांना केंद्र बिंदू मानून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे ठाणे विकास परिषद-२०२४ भरविण्यात आली. या परिषेदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याची इकॉनॉमी २०३० पर्यंत ४८ बिलियनवरून दीड ट्रिलियन बनविण्याच्या नियोजनबद्ध आराखड्याचे कौतुक करीत त्यासाठी लक्ष केंद्रित करून काम करण्याच्या सूचना सर्व अधिकान्यांना दिल्या.

ते पुढे म्हणाले, ठाण्याला काही गोष्टी सुरू होतात मग त्या सगळीकडे सुरू होतात. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन चनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एकटया मुंबई एमएमआर क्षेत्रात २ ट्रिलियनपेक्षा अधिकची आर्थिक क्षमता आहे. त्याकरिता मित्राने पुढाकार घेऊन निवडक ८ सेक्टरमध्ये आपण जर काम केलं तर नक्कीच उद्दिष्ट्य पूर्ण कला आणि खऱ्या अगनि सर्वांना घर, सर्वांना नोकऱ्या, नवीन उद्योग देऊ शकू. प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र देशाचं पावर हाऊस होईल म्हणजे एवढी क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र पुन्हा पहिले नंबरवर आलेला असून जीडीपी, इंडस्ट्री, परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर बनला आहे. संपूर्ण देशात जी परदेशी गुंतवणूक आली आहे त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आली आहे.

पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये देखील महाराष्ट्र नंबर एक असून आता पर्यावरणाचा विषय घेतला आहे. अटल सेतूनंतर खाडीतील प्लेमिंगो दुप्पट वाढल्याचा एनजीओचा अहवाल आहे. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ठाण्यामध्ये देखील ईस्टर्न फ्री बेचा विस्तार हा मुंबईतील खेडा नगर सर्कल ते साकेत बाया आनंद नगर ते आपण थेट बाळकुम वरून घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलला जोडला जाईल. त्यामुळे वाहने बाहेरचे बाहेर म्हणजे सिग्नल मुक्त प्रवास करीत ४० मिनिटांमध्ये मुंबई ते घोडबंद रोडद्वारे अहमदाबादला निघून जातील. ठाणे बोरवली भुयारी मार्गामुळे २० मिनिटात प्रवास होणार आहे. हव्वई, राज्याच्या प्रगतीसाठी रोड, रेल्वे, पाणी, हवा कनेटिव्हिटी वाढविणे आवश्यक असल्याने आत्ता पालघरमध्ये तिसरे एअरपोर्ट बनविण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास दोन लाख कोटींची करारनामे करण्यात आले असून इतर राज्यापेक्षा उद्योगांना चांगल्या सुविधा देऊन इंडस्ट्री वाढविली पाहिजे तरच रोजगार वाढेल. पायाभूत सुविधा आणि त्याबरोबर पर्यावर, पर्यटनवर भर दिले जात आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये पाच इमारतींचे काम सुरु झाले असून मुंबईतील रखडलेल्या एस आर ए च्यायोजना एमएमआरडीए, सिडको महापालिका हाती घेऊन पुन्हा सुरु करणार आहेत, १७००० घरांचं प्रकल्प आपण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT