Solapur News | जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकर्‍यांना अवजारे File Photo
सोलापूर

Solapur News | जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकर्‍यांना अवजारे

सांगोला पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची गरज व मागणी लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध अवजारांसह आवश्यक उपकरणे, ट्रॅक्टरचलित अवजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे ही 50 टक्के अनुदानावर डीबीटी धोरणानुसार दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, कृषी विस्तार अधिकारी बाबासाहेब खटकाळे यांनी दिली.

शेतकर्‍यांना 20 जून 2025 पर्यंत सांगोला पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. या योजनेत अल्पभूधारक, दिव्यांग, महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी 7/12 उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत या कागदपत्रांसह आपले अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावेत.

डी. बी. टी. योजनेतून लाभार्थीची निवड झाल्यावर शेतकर्‍यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून अवजारे खरेदी करावी लागणार आहेत. तसेच खरेदी करावयाची शेती अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असणे आवश्यक असणार आहे. लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. अनुदान संबंधित शेतकर्‍याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर पी.एफ.एम.एस. डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल.

या साहित्यांचा समावेश 

श्री पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ब्रश कटर, सोलार इनसेक्ट ट्रॅप, रोटावेटर, पलटो नांगर, पॉवर विडर, पेरणी यंत्र, 5 एच. पी. सबमर्सिबल पंपसंच, डिझेल इंजिन, कडबा कुट्टी, ताडपत्री, स्लरो फिल्टर ही अवजारे तसेच मधुमक्षिका पेटी व ताग या हिरवळीच्या खताच्या बियाण्यांचादेखील समावेश यावर्षी करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT