पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकर्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे. या सार्या संकटातून शेतकर्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करुन कर्जमाफी करावी. या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
पंढरपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे द्राक्ष, डाळींब, केळी बागा तसेच इतरही अनेक भुसार पिके उध्वस्त झाले आहेत. मात्र, 24 तासात 65 मिलीमीटर पावसाच्या निकषामुळे भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. असे निवेदन तहसील कार्यालयाला देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना सहसचिव स्वप्निल वाघमारे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, काकासाहेब बुराडे, जयवंत माने, तालुकाप्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, रणजित कदम, शिवाजी जाधव, नागेश रितूड, उत्तम कराळे, संजय घोडके, अनिल जाधव, अर्जुन भोसले, प्रशांत जाधव, विजय नलावडे, दादा कुंभार, अंकुश साळुंखे, सोमनाथ अनपट, कुंदाताई माने, संगीता ताई पवार, मंजुळाताई दोडमिसे, अनिताताई आसबे, सरस्वती गोसावी, रेहाना आतार आदीसह शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते.