सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी आणि सीना, भीमा खोऱ्यातील काही पट्ट्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 7 लाख 64 हजार 173 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे 867 कोटी 37 लाख रुपयांचे नुकसान झाले असून भरपाई म्हणून तेवढ्याच निधीची गरज असल्याचे शासनास सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
फळपिके सोडून जिल्ह्याभरातील 2 लाख 56 हजार 249 शेतकऱ्यांचे 2 लाख 57 हजार 592 हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी 218 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यातील 3 लाख 70 हजार 189 शेतकऱ्यांचे फळपिके सोडून बागायत पिकांचे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.