सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीसह महापूराने शेतकर्यांची स्थिती बिघडलेली आहे. ते पार मोडून पडलेले आहेत. सत्ताधारी कुंभकर्णासारखे झोपलेले आहे. त्यांना जागा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, लक्ष्मण जाधव, महेश धाराशिवकर, नाना मोरे, शशिकांत बिराजदार, रवी घंटे, मंगल मोरे, भारती मुनोली, सोनाली भोसले, मीना जाधव, ललिता सावलगी आदींनी यावेळी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक स्वरूपात झोपलेले दाखवणारे पथनाट्यही यावेळी सादर केले.