सोलापूर : दुचाकीवरून जात असताना अचानक मांजर आडवे आल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तिऱ्हे (ता. मोहोळ) येथील सागर जीवन मलाव हे (एमएच 13 इआर 5073) दुचाकीवरून आनंदनगर येथील हॉटेल समृद्धी जवळून जात होते. दुचाकीच्या समोर अचानक मांजर आडवे आल्याने त्याने एकदम जोरात दुचाकीला ब्रेक दाबला.
पाठीमागे बसलेल्या शुभांगी मलाव (वय 23) ह्या खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना या तरुणीचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. एक नोव्हेंबर रोजी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात नोंद झाली. दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.