वैराग: बार्शी - सोलापूर रोडवर वैराग जवळील काळेगाव पाटीजवळ चारचाकी व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.) रात्री ९ च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एम एच १३ डी टी ९९७७ ही पांढऱ्या रंगाची इरटिका गाडी बार्शीहुन वैरागकडे येत होती. काळेगाव पाटीजवळ येत असताना एम एच १३ डी एस ००४२ या दुचाकीवर असणारा इसम अचानक आडवा आला. त्यामुळे दुचाकीचालकाला वाचवताना ही गाडी बाजूच्या खोल दरीत पडली असता यामध्ये असणारे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये मुंगशी (ता. बार्शी) येथील चौघे रहिवासी असून दोघे सोलापूर येथील रहिवाशी आहेत.
वैराग पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक विश्वजित जगदाळे , उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पो कॉ. सचिन मुंढे , पो.कॉ श्रीमंत कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.