पंढरपूर : श्री विठ्ठल दर्शन घेऊन पायी चालत येताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री गिरीश महाजन, आ. समाधान आवताडे, आमदार राजू खरे, महेश साठे आदी. Pudhari Photo
सोलापूर

Eknath Shinde | ना. शिंदे चालत आले आणि घेतले विठ्ठलाचे मुखदर्शन

भक्तीसागर, चंद्रभागा वाळवंट येथे दिल्या भेटी, दर्शन रांगेत भाविकांशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेतले. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले. तसेच प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी पुरवण्यात येणार्‍या सेवा-सुविधांची पाहणी केली. दर्शनरांगेतील भाविकांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. झालेल्या कामांची पाहणी केली. तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री गेले चालत

चौफळा ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचारनुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता. भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास निर्माण होऊ नये, म्हणून चौफाळा ते मंदिरपर्यंत दर्शनासाठी चालत गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT