सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला आता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा ‘क’ वरून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपूर्वी याविषयी दिलेला शब्द पाळल्यामुळेच हे शक्य झाले, अशी माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी दिली. यापूर्वी ‘क’ दर्जा असल्याने रुग्णालयात अनेक महत्त्वाच्या आजारांवर शासकीय योजनेतून उपचार करणे अशक्य होत होते. त्यामुळे अधिक आजारांवर उपचार मिळावेत, अशी मागणी नागरिक आणि संचालक मंडळाने केली होती.
आ. कोठे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीनंतर आ. कोठे यांनी सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन डॉ. माणिक गुर्रम आणि इतरांना सोबत घेऊन ‘आयुष्यमान भारत’चे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची भेट घेतली. या पाठपुराव्यामुळेच रुग्णालयाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे.
या सुधारणेमुळे सोलापूर शहर, जिल्ह्यासह कलबुर्गी, विजयपूर, लातूर येथून येणार्या हजारो गोरगरीब रुग्णांना शासकीय योजनेतून शेकडो आजारांवर उपचार घेणे आणि मोठा आर्थिक लाभ मिळणे शक्य होणार आहे.- देवेंद्र कोठे, आमदार