टप्पा (ता. माळशिरस) : येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव महाराज पालखींचा बंधुभेट सोहळ्याप्रसंगी झालेली भाविकांची गर्दी. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | भेटले ज्ञानोबा-सोपान; हरपले भान

पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश; तालुका प्रशासनाकडून स्वागत

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : वेळापूरचा मुक्काम आटोपून माऊलींचा पालखीचा ठाकूरबुवा यांच्या समाधी मंदिराजवळ नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा पार पडला. यानंतर पालखी सोहळा माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची टप्पा येथे बंधुभेट झाली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘विठ्ठल विठ्ठल’चा जयघोष केला. माऊलींच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेवांच्या मानकर्‍यांना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधुभेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले.

आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधुभेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माऊलींचा पालखी सोहळा विसावला. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माऊलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. माऊलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT