सातारा

Shivendraraje Bhosale | ना. शिवेंद्रराजेंमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य : मकरंद देशपांडे

इलेक्ट्रिक सायकलसह 803 वस्तूंचे दिव्यांगांना वाटप

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी विविध उपक्रम राबवत आहे. समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌‘सेवा सुशासन पंधरवडा‌’ आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक सायकल, व्हील चेअर यासह आवश्यक अशा 803 साहित्याचे वाटप करण्यात आले. ना. शिवेंद्रराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे, असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांनी केले.

सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात भाजपच्या ‌‘सेवा सुशासन पंधरवडा‌’ निमित्त ना. शिवेंद्रराजे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना 75 इलेक्ट्रिक सायकल, 70 व्हील चेअर, 12 कमोड चेअर, 136 अंध काटी, 36 दिव्यांग काटी, 5 एल बो स्टिक, 230 श्रवण यंत्र, 47 वॉकर, 8 कुबडी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देशपांडे बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, सरिता इंदलकर, लोकसभा संयोजक सुनील काटकर, अविनाश कदम, धैर्यशील कदम, महेश गाडे, संदीप परामने, मारुती चिकणे, धनंजय जांभळे, श्रीहरी गोळे यांच्यासह भाजपचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, दिव्यांग बंधू आणि भगिनींना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. त्यांच्यासाठी होईल एवढी मदत नेहमीच करत आलो आहे. आज पंतप्रधान नरेंनद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि ‌‘सेवा सुशासन पंधरवडा‌’ निमित्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना फुल नाही फुलाची पाकळी देता आली, त्यांना मदत करता आली याचे मला मनस्वी समाधान आहे. मी व माझ्या सहकाऱ्यांनी गरजू दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल, व्हील चेअर व इतर आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय घेतला. कोणतीही शासकीय मदत न घेता मला हे करता आले, त्यासाठी देवाने मला सक्षम बनवले यासाठी मी देवाचे आभार मानतो.

मिळालेल्या साहित्याबद्दल उपस्थित दिव्यांग बांधव, भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ना. शिवेंद्रराजे यांचे आभार मानले. अविनाश कदम यांनी प्रास्तविक केले. सुनील मोरे पाटील यांनी सूत्रसंचलन केले. संदीप परामने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग बांधव, भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT