लोणंद : माऊलींच्या वारीतील वारकर्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वर सेवा आहे. वारीतील वारकर्यांना विविध प्रकारे सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ही भाग्याची व पुण्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
लोणंद येथे खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अन्नदान छत्र उद्घाटन प्रसंगी ना. मकरंद पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन खा. नितीनकाका पाटील, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, माजी कृषी सभापती मनोज पवार, बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, माजी सभापती राजेंद्र तांबे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, नगरसेवक सागर शेळके, शंकरराव क्षीरसागर, मराठा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. अनिलराजे निंबाळकर, सुनील शहा, सागर शेळके, उदयसिंह जगताप, रवींद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, राजेश गुजर, अजय भोसले व मान्यवर उपस्थित होते.