सणबूर : पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ना.शंभूराज देसाई यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
आमदारांच्या स्थानिक विकास निधी,सर्वसाधारण साकव योजना व विशेष घटक साकव योजना या योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी ना. देसाई यांनी शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
ना.देसाई यांनी विविध विकास कामांना शासनाचे वेग वेगळया योजनांमधून निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागांनी या कामांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले होते. ना. देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आमदारांचे स्थानिक विकास निधी, सर्वसाधारण साकव योजना व विशेष घटक साकव योजना या योजने अंतर्गत 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
स्थानिक विकास निधी अंतर्गत कुंभारगाव ते भैरवदरा ररस्ता डांबरीकरण 10 लाख, कामरगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, जाधववाडी (मालदन) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, आंबेवाडी (घोट) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, गर्जेवाडी (कडवे ) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे व गटर 15 लाख, वाघणे गावपोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, गोठणे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळ हवेली येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मारुलहवेली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, मेंढोशी वरची येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, गोठणे लिंगवणे ओढा ते गावातील मागासवर्गीय वस्ती सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे बौध्दवसती स्मशानभूमी संरक्षक भिंत 15 लाख, चौगुलेवाडी (काळगाव) आचरेवाडी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सातेवाडी मातंगवस्ती (नाटोशी ) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे खुर्द ता.पाटण साबळेवाडी शिव अंतर्गत रस्ता सुधारणा 6.95 लाख या प्रमाणे 15 कामांसाठी 2 कोटी 21 लाख 95 हजार तर
सर्वसाधारण साकव योजने अंतर्गत कोंजवडे ओढयावर साकव 43.15 लाख,तोंडोशी ओढयावर साकव 78.34 लाख,जाळगेवाडी खालची स्मशानभूमी ओढयावर साकव 54.20 लाख,धावडे येडोबा मंदिर रस्त्यावरील ओढयावर साकव 40 लाख, मंगेवाडी मरळी येथील ओढयावर साकव 40 लाख, केळोली खालची येथे ओढयावर साकव 51.67 लाख, धामणी जाधववस्ती ओढयावर साकव 69.99 लाख, साबळेवाडी मानेवस्ती जवळ साकव 38.89 लाख, ऊरुल ते बोडकेवाडी रस्त्यावरील ओढयावर साकव 49 लाख, आडदेव खालचे येथे (स्लॅब ड्रेन )साकव असे 10 साकवचे कामांसाठी 4कोटी 95 लक्ष 24 हजार आणि विशेष घटक साकव योजने अंतर्गत मरळोशी मागासवर्गीयवस्ती रस्त्यावर साकव 45.16 लाख,मंद्रुळकोळे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 39.93 लाख व मुळगाव मागासवर्गीयवस्ती रस्त्यावर साकव 40 लाख असे मागासवर्गीय वस्त्यांमधील ओढयावर साकवचे कामांसाठी 1 कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.