तासवडे टोलनाका : ग्रामविकास आणि लोकसहभाग याला प्रोत्साहन देणारा आगळा-वेगळा उपक्रम तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दीपाली जाधव यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे. दीपाली जाधव यांनी आपल्या सरपंच मानधनातून वेळेवर कर भरणार्या ग्रामस्थांचा सन्मान करत लकी ड्रॉ काढून बक्षीस वितरणही केले.
लकी ड्रॉ चे बक्षीस वितरण कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकार प्रताप पाटील, माळी, अमित जाधव, मृणालिनी मोहिते, माजी सरपंच संग्राम पवार, उमेश मोहिते, उपसरपंच मनिषा जाधव, ग्रा.स.सुभाष जाधव,भारती शिंदे,लता जाधव, कृष्णा देशमुख, ग्रामसेवक महादेव जाधव यांच्या हस्ते 20 करदात्यांना 20 हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली.
सरपंच हे गावच्या सेवेचे पद असून, यामधून गावची सेवा व्हावी तसेच नवनवीन योजना राबवाव्यात या हेतूने शासनाकडून सरपंचांना मिळणारा पगार स्वतःसाठी न वापरता तो पगार गावच्या विकासासाठी तसेच विविध योजनांसाठी वापरण्याचे दीपाली जाधव यांनी ठरवले आहे. ग्रामस्थांनी वेळेवर कर भरला तरच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे व योजना राबवण्यात येऊ शकतात. त्यासाठी सहकार्य हवे असे जाधव म्हणाल्या. दरम्यान, तासवडे गावातील बहुतांशी ग्रामस्थ वेळेवर कर भरत असतात. त्यांना प्रेरणा मिळावी आणि इतर थकबाकीदारांनी वेळेवर कर भरणा करावा यासाठी 31 मार्च 2025 अखेरचा संपूर्ण घरफळा, पाणीपट्टी व इतर कर येणे बाकी नसलेल्या सुमारे 270 मिळकतदारामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास लक्ष्मण जाधव, युवराज जाधव, विकास जाधव, बाळासो जाधव,राजेंद्र जाधव, पांडुरंग शिंदे, संग्राम जाधव, संदीप जाधव, भगवान शिंदे, रामचंद्र जाधव, शंकर जाधव, सुनील जाधव, अभिजीत जाधव, विश्वास जाधव, शहाजी जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.