लोणंद : मोटे मळा, लोणंद येथील कपील जाधव यांच्या सम्राट टाईल्स या दुकानात चोरी करुन सुमारे दिड लाखांची रोखड लंपास करणार्या दाम्पत्याला लोणंद पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जेरबंद केले. संशयितांकडून चोरीची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
दस्तगिर मुबारक सय्यद (वय 41 रा. देऊर ता. कोरेगाव) व त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटे मळा, लोणंद येथील कपील जाधव यांचे सम्राट टाईल्स या नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेवून अज्ञाताने 1 लाख 47 हजारांची रोखड लंपास केली होती.
याबाबत कपील जाधव यांनी लोणंद पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या चोरीचा तपास सपोनि सुशिल भोसले व त्यांचे पथक करत होते. पोलिसांना ही चोरी देऊर ता. कोरेगाव येथील दस्तगिर मुबारक सय्यद व त्यांच्या पत्नीने केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही अवघ्या 12 तासात अटक केली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल भोसले, पो.हवा. संतोष नाळे, पो.ना बापुराव मदने, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, विठ्ठल काळे, अमीर जाधव, अश्विनी माने यांनी केली.