सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील दत्त-मारुती रस्त्यावर दुकानांसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेने शुक्रवारी रात्री अकरा वाजता कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या तयारीसाठी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांसमोर मंडप उभारणे सुरू केले आहे. मात्र, वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून महापालिकेने केवळ दहा फूट मंडप लावण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेचे पथक शुक्रवारी रात्री रस्त्यावर मार्किंग करण्यासाठी गेले असता, ठोंबरे-चिरमुरे दुकानासमोरचा मंडप नियमबाह्य असल्याचे आढळले. मंडप रस्त्यावर सुमारे अठरा फूट पुढे आल्याचे निदर्शनास आले तसेच परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि संबंधित व्यावसायिकामध्ये वाद झाला. त्यानंतर रोकडे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमण काढून टाकले. या कारवाईत सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, नगर अभियंता महेश मदने, शाखा अभियंता ऋतुराज यादव तसेच कर्मचारी सहभागी होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फक्त दहा फूट मंडपाला परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त मंडप अतिक्रमण म्हणून गणले जाईल. त्यामुळे इतर व्यावसायिकांनीही स्वखुशीने जादाचा भाग काढण्यास सुरुवात केली आहे. दत्त-मारुती रस्त्यावर दुकानांसमोरील अतिक्रमणांवर महापालिकेने शुक्रवारी रात्री अकरा वाजता कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या तयारीसाठी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांसमोर मंडप उभारणे सुरू केले आहे. मात्र, वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून महापालिकेने केवळ दहा फूट मंडप लावण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
महापालिकेचे पथक शुक्रवारी रात्री रस्त्यावर मार्किंग करण्यासाठी गेले असता, ठोंबरे-चिरमुरे दुकानासमोरचा मंडप नियमबाह्य असल्याचे आढळले. मंडप रस्त्यावर सुमारे अठरा फूट पुढे आल्याचे निदर्शनास आले तसेच परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि संबंधित व्यावसायिकामध्ये वाद झाला. त्यानंतर रोकडे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमण काढून टाकले. या कारवाईत सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, नगर अभियंता महेश मदने, शाखा अभियंता ऋतुराज यादव तसेच कर्मचारी सहभागी होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फक्त दहा फूट मंडपाला परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त मंडप अतिक्रमण म्हणून गणले जाईल. त्यामुळे इतर व्यावसायिकांनीही स्वखुशीने जादाचा भाग काढण्यास सुरुवात केली आहे.