चरण; पुढारी वृत्तसेवा : अकरावे डोंगरी साहित्य संमेलन बुधवारी (दि. 1 मार्च) पणुंब्रे वारुण येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे भूषवणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी रघुराज मेटकरी आहेत, अशी माहिती डोंगरी व शब्दरंगचे अध्यक्ष कवी वसंत पाटील व स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले, पणुंब्रे वारुण येथील जोतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर हे संमेलन होत आहे. उद्घाटक खा. धैर्यशील माने तर प्रमुख पाहुणे सत्यजित देशमुख हे आहेत. दुसर्या सत्रात उद्योजक बळीराम पाटील-चरणकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सदानंद मोरे, प्रा. प्रदीप पाटील, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार गणेश शिंदे, तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत उत्कृष्ठ साहित्य निर्मितीच्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सुधीर कुलकर्णी हे कथाकथन सत्राचे अध्यक्ष आहेत. कथाकथनकार हिम्मत पाटील, कथाकार जगन्नाथ माळी हे सहभागी होत आहेत. दुपारी 4.30 वाजता कवी रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.