भाजपची 97 जणांची शहर, जिल्हा जंबो कार्यकारिणी जाहीर File Photo
सांगली

Sangli News : भाजपची 97 जणांची शहर, जिल्हा जंबो कार्यकारिणी जाहीर

पाच सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष : युवा मोर्चा अध्यक्षपदी कर्वे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भाजपची शहर जिल्हा पदाधिकारी, सदस्यांची 97 जणांची जंबो कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी जाहीर केली. जिल्हा कार्यकारिणीत 5 सरचिटणीस, 8 उपाध्यक्ष, 9 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 1 प्रसिद्धीप्रमुख 1 तसेच 73 सदस्यांचा समावेश आहे. युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्षपदी शांतीनाथ कर्वे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी स्वाती खाडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सुजीत काटे यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी घोषित करत आहोत. पालकमंत्री व दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत पत्र वाटप कार्यक्रम होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष ढंग यांनी म्हटले आहे.

शहर जिल्हा कार्यकारिणी : सरचिटणीस- विशाल पवार, बाबासाहेब आळतेकर, धनंजय कुलकर्णी, विश्वजित पाटील, स्मिता भाटकर. उपाध्यक्ष - अजिंक्य पाटील, अतुल माने, राहुल सकळे, महेश धयारे, दादा शिंदे, विजय पाटील, उमेश पाटील, हेमलता मोरे. चिटणीस - गणेश चौगुले, जयगोंड कोरे, शैलजा शिरदवाडे, शरद नागरगोजे, महेश क्षीरसागर, रुपाली अडसूळ, रवींद्र सदामते, उदय मुळे, श्रीकांत वाघमोडे. कोषाध्यक्ष- धनेश कातगडे. प्रसिद्धीप्रमुख- केदार खाडिलकर. शहर जिल्हा कार्यकारिणीत 73 सदस्यांचा समावेश आहे.

जिल्हा मोर्चा अध्यक्ष असे...

शांतीनाथ कर्वे : युवा मोर्चा

हर्षल फल्ले : ओबीसी मोर्चा

सुजित काटे : अनुसूचित जाती मोर्चा

सुहास पाटील : अल्पसंख्याक मोर्चा

स्वाती खाडे : महिला मोर्चा

तानाजी पाटील : किसान मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT