कवठेमहांकाळ : येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम पाटील यांची सांगली येथे बदली झाली. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्तीचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरुवारी दिले.
दरम्यान, शुक्रवारी पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्याकडून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचा पदभार निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी स्वीकारला. नूतन निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांचा कवठेमहांकाळ तालुका पोलिस पाटील संघटना, विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी यावेळी सत्कार केला.