सांगली : सततच्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. गवारीचा दर दीडशे रुपये किलो झाला आहे. फळभाज्यांमध्ये वांगी, टोमॅटोच्या दरात थोडी घट झाली आहे.
पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोबी, फ्लॉवर, पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. या सप्ताहात कोथिंबीर 20 ते 25 रुपये, तर पालेभाज्यांमध्ये शेपू, चाकवत, कांदापात, तांदळ यांचे दर 15 ते 20 रुपये पेंढी राहिले. मेथी 25 रुपये पेंढी आहे. वांगी 50 ते 60 रुपये, देशी गवारी 140 ते 150 रुपये, टोमॅटो 30 रुपये किलो आहे. इतर भाज्यांचे दर प्रति किलो असे आहेत. हिरवी मिरची 60 ते 70 रुपये, बंदरी गवारी 70 ते 80, दोडका 60 ते 70, देशी काकडी 60 ते 70, ढबू मिरची 50 ते 60, दुधी भोपळा 15 ते 20 रुपये नग, भेंडी 40 ते 50 रुपये, फ्लॉवर, कोबी 15 ते 20 रुपये नग, आले 80 ते 80, कांदा 25 ते 30, लसूण 80 ते 100, भुईमूग 80 ते 100 रुपये, मका कणीस 8 ते 10 रुपये नग.
पेरू, सफरचंदाची आवक वाढली
या सप्ताहात सफरचंदाबरोबरच पेरूची आवक वाढली आहे. सिमला सफरचंद 130 ते 150 रुपये किलो आहे. सिमला सफरचंदाची आवकही वाढली आहे. विदेशी सफरचंद 140 ते 150 रुपये किलो आहे. पेरू 80 ते 100 रुपये किलो आहे. देशी केळीचे दर 50 ते 60 रुपये डझन आहेत. डाळिंब 150 ते 160 रुपये किलो, चिकू 130 ते 140, मोसंबी 90 ते 100 रुपये किलो आहे. अननस 50 ते 60 रुपये नग, वसई केळी 35ते 40 रुपये डझन, ड्रॅगन फ्रूट 100 ते 120, आलू बुखार 250 रुपये किलो, सीताफळ 100 ते 110 रुपये किलो असा दर आहे.