कुपवाड : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील शासकीय जमिनीवर राज्य कामगार विमा योजनेचे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमधून स्वागत होत आहे.
जिल्ह्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेचे सर्व सोयींनीयुक्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व संचालकांनी गेली दहा वर्षे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा चालविला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाबाबत माहिती घेतली. यासाठी आ. सुधीर गाडगीळ यांनीही पाठपुरावा केला.