भुईंज येथे अपघातात मृत्यू  File Photo
सांगली

खेराडे वांगीतील तरुणाचा भुईंज येथे अपघातात मृत्यू

करण शिंदे

भुईंज/नेवरी : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला. पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर साहिल पांडुरंग हजारे (19, दोघेही रा. खेराडे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पीयूष कोरे व साहिल हजारे हे पुणे येथील सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंगला आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने ते खेराडे वांगी या त्यांच्या गावी गेले होते. सोमवारी खेराडेे वांगीतून ते दुचाकीवरून पुण्याला निघाले होते. पहाटे 4.30 च्या सुमारास ते जोशीविहिर परिसरात आले. तेथे भरधाव दुचाकीवरचा पियुषचा ताबा सुटला आणि दुचाकी दुभाजकाला धडकली. परिसरातील लोकांनी त्यांना रूग्णवाहिकेने सातारा जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पियुषचा मृत्यू झाला. तर साहिल हा गंभीर जखमी झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT