नेरळ : रायगड जिल्हयासह कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक व अतिदुर्गम भाग असलेल्या झुगरे वाडी फाटा ते बळीवरे नांदगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे समस्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मात्र या अतिदर्गम भागातील विद्यार्थी व तरुण हे यांचे शिक्षण व रोजगार तसेच या भागातील नागरिकांच्या बाजाराहाटासाठी मुख्य सेवा असलेली मुरबाड एस टी सेवा ही फेऱ्या कमी व बंद होण्याच्या मार्गावर आहे.
या भागातील विद्यार्थी व तरुण हे यांचे शिक्षण व रोजगार तसेच या भागातील नागरिकांच्या बाजाराहाटावर गदा येणार असल्यामुळे या भागातील नागरीकांकडून शासन व प्रशासना विरोधात मोठया प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असलेल्या नांदगाव, बळीवरे, चई, चवणा झुगरेवाडीसह आदी गावातील विद्यार्थी व तरूण हे म्हसा, मुरबाड व कल्याण शहर हे जवळ असल्याने शिक्षण, कामधंदा व नागरिक हे मोठ्या प्रमाणात बाजाराहाटाकरीता ये-जा ही नांदगाव, बळीवरे ते झुगरे वाडी फाटा व पुढे म्हसा व मुरबाड रस्त्याचा व या मार्गावरील एसटी बसने मोठया प्रमाणात प्रवास करीत आहे. तर मुरबाड बस डेपोतील एसटीच्या सकाळी 6, 9, 10, दुपारी 12, 3, संध्याकाळी 5, 7 व रात्री शेवटची 8 वाजल्या प्रमाणे दिवसभरात एकूण सात फेऱ्या सुरू आहेत, मात्र नांदगाव, बळीवरे ते झुगरे वाडी फाटा या मुख्य रस्त्याची कित्तेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे.
या रस्त्याचे झालेल्या दुरावस्थेकडे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, या रस्त्याची अक्षरशः दैनिय आवस्था झाली आहे. मात्र रायगड जिल्हयासह कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या भागातील चई, चेवणे, बळीवरे, नांदगाव, झुगरेवाडी, कोतवालवाडी, भोपली, गोरेवाडी, डामसेवाडी, चिंचवाडी, मोहपाडा अशा अनेक गावातील शालेय विद्यार्थी हे म्हसा, मुरबाड व कल्याण येथे शिक्षण घेण्यासाठी येतात.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या कर्जत बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश खिलारे यांनी सांगितले की, या रस्त्याची पाहाणी करण्यासाठी अधिकारी पाठवून, लवकरात लवकर या रस्त्याचे कामासंदर्भात कारवाई केली जाईल.
गेली कितेक वर्ष प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे नादगाव, बळीवरे ते झुगरेवाडी फाटा रस्त्याची अक्षम्य दुरवस्था झाली आहे. शासन मोठया प्रमाणात विकास कामासाठी निधी देतो परंतु तो नेमका कुठे व कसा वापरावा याचे नियोजन नसल्याने व अतिदुर्गम भाग असल्याने होणारे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष यामुळे येथील विद्यार्थी व तरूण यांच्या शिक्षण व रोजगारावर गदा येणार असल्याची वेळ येणार आहे. याची दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.कृष्णा शिंगोले, उपाध्यक्ष , कर्जत ग्रामीण मंडळ भाजपा