कामोठ्यात उभ्या कारची चाके चोरीला Pudhari Photo
रायगड

Kamothe | कामोठ्यात उभ्या कारची चाके चोरीला

पुढारी वृत्तसेवा

कळंबोली : कामोठ्यात भुरट्या चोरांनी आता चोरी करण्याचा मोर्चा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांकडे वळवला आहे. शनिवारी रात्री रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या व्हॅगनार गाडीची मागील टायर सहित दोन चाक काडून नेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्यांचा तपास सुरू आहे.

कामोठे येथील सेक्टर 19 मध्ये प्रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये विनायक बाळकृष्ण शिराळकर हे राहत आहेत. व्यवसायाने सोसायटी लेखापरीक्षण करणारे लेखापरीक्षक आहेत. त्यांच्या मालकीची एम एच.02 सीबी 1633 क्रमांकाची व्हॅगनार गाडी त्यांनी शनिवारी रात्री सोसायटीच्या जवळील रस्त्यावर उभी करून ठेवली होती. मात्र चोरट्यांनी या गाडीचे लॉक तोडून आतील सामान सगळं अस्त व्यस्त केले. गाडीतल्या जॅक काढून त्याने एका बाजूला लावून प्रथम एक टायर्स सहित चाक काढले व तेथे गाडीतील स्टेफनी लावून ठेवली . नंतर मागील बाजू कडील दुसरा टायर काढून तेथे जॅक लावून ठेवला अन दोन्ही चाके घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे .गाडीतील अन्य वस्तूंचेही अस्तव्यस्त करण्यात आले आहे . गाडीचे लॉक तोडून त्याचेही नुकसान करण्यात आले आहे.

सकाळी कामानिमित्त निघत असताना गाडीमध्ये गाडीची चाके चोरीस गेल्याचे विनायक शिराळकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यास केल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली.

सीसीटीव्हीतून तपासणी

चोरीची घटना ज्या ठिकाणी घडली त्या आजूबाजूच्या सोसायटीमधील सीसीटीव्ही चे छायाचित्रणही तपासले. याबाबतचा अधिक तपास कामोठे पोलीस ठाणे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT