रेवदंडा (रायगड) : महेंद्र खैरे
ज्या दोन पुलाने अलिबाग ते रेवदंडा हे अंतर अवघ्या दहा मिनिटावर येईल, त्या अलिबाग ते आक्षी साखर व थेरोंडा समुद्र खाडी या दोन पुलाची प्रतिक्षा व वेध येथील स्थानिकांना लागले आहे. अलिबाग ते आक्षी साखर व थेरोंडा खाडी या दोन पुलाच्या निर्मितीने पर्यटन विकासासह पंचक्रोशीचा आमुलाग्र परिवर्तन निश्चित असेल.
ज्या काळात एस.टी. सेवा नव्हती, त्यावेळी रेवदंडा कडून अलिबाग कडे जाताना या मार्ग फारच उपयुक्त होता. थेरोंडा आगलेची वाडी येथील छोटा साकव पुलाचे मार्ग आक्षी साखर येथील तर सेवेने (होडी सेवा) अलिबागकडे जा-ये होत असे. रेवदंडा येथून पायी चालत अथवा घोडागाडी, बैलगाडी आदीच्या सहाय्याने आक्षी साखर पर्यंत प्रवासीवर्ग प्रवास काही मिनिटात पार करत होते. मात्र एस.टी. सेवा सुरू झाली, आणी अलिबागकडे जाणारा हा मार्ग चौल, आक्षी मार्गे बेलकडे, कुरूड या गावाचे बाजूने हमरस्ता सुरू झाला.
रेवदंडा ते अलिबाग एस.टी. प्रवास सुरू झाल्याने कालांतराने आक्षी साखर येथील तर सेवा बंद झाली व सध्याचा रेवदंडा, आक्षी, बेलकडे, कुरूळ हा मार्ग प्रवासीवर्गाने अंगिकारला. परंतू पुर्वीचा रेवदंडा, आक्षी साखर तर सेवेचा जुना मागनि फारच कमी वेळेत अलिबागला पोहचता येईल, या जुन्या मार्गात अलिबाग ते आक्षी साखर व थेरोंडा समुद्र खाडी दोन पुलाची प्रतिक्षा येथील स्थानिकांना आहे. या पुलाच्या निर्मितीने आक्षी, नागाव, चौल व रेवदंडा या ग्रामपंचायत परिसरातील गावे अलिबागला फारच जवळ येणार आहेत. शिवाय यापुलाच्या निर्मितीने अलिबागकडे येत असलेल्या पर्यटक निश्चितपणे वाढ होणार आहे. तसेच आक्षी, नागाव, चौल व रेवदंडा या ग्रामपंचायत परिसरातील पंचक्रोशीचा आमुलाग्र परिवर्तन निश्चितपणे होईल. शिवाय हा मार्ग अस्तित्वात आल्यास मुरूड तालुका सुध्दा अलिबागला फारच नजीकचा असेल. सध्यस्थितीत अलिबाग व मुरूड पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत होत आहे. मुंबई, ठाणा आदी शहराकडून अलिबाग व मुरूड तालुक्यात नेहमीच येणार्या पर्यटकांची वाढ होणार असून मांडवा ते रेवदंडा असा निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राचा आस्वाद वनडे पिकनिकव्दारे मुंबईकरांना घेता येईल.
थेरोंडा आगलेची वाडी नजीकचा अगदीच छोटा पायपिट व घोडागाडी व बैलगाडी साठी असलेल्या साकव पुलाची फारच दुरावस्था झाली आहे. हा साकव पुल नव्याने बांधण्यात यावा म्हणून येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आदीच्या दप्तरी निवेदन अर्ज केले आहेत. सन २०१२ साली, हा पुल होण्यासाठी केलेल्या निवेदन अर्जास निधी उपलब्ध झाल्यावर हा पुल होईल असे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र या आश्वासनाला केराची टोपली दाखविली गेली आहे, असे थेरोंडा ग्रामस्थ अशोक अंबूकर यांनी सांगितले. आक्षी साखर ते अलिबाग समुद्र खाडी मार्ग अगदीच नजीकचा अलिबाग अथवा आक्षी साखर येथून दोन्ही गावे पहाता येतात, स्थानिकांनी सुध्दा या पुलाच्या मागणीचा पाठपुरावा केला नाही असेच म्हणावे लागेल. मात्र आक्षी साखर ते अलिबाग समुद्र खाडी पुलाची निर्मिती केव्हाच होणे गरजेचे होते.
अलिबाग शहर येणार जवळ
अलिबाग ते आक्षी साखर व थेरोंडा समुद्र खाडी दोन पुलाची निर्मितीने आक्षी, नागाव, चौल व रेवदंडा या ग्रामपंचायत अंतर्गत गावाना अलिबाग अवघ्या काही मिनिटिावर येईलच परंतू अलिबागकडून पर्यटक निश्चितपणे या परिसरात येईल व पर्यटनास वाढ होईल. अलिबाग शहर अगदीच जवळ आल्यास या परिसरात निश्चित आमुलाग्र बदल घडून येईल, हे निश्चित आहे. मात्र संबधीतानी या दोन पुलाकडे आजपर्यंत गांर्भियाने का पाहिले नाही, अथवा राजकीय व सामाजीक क्षेत्रातील मंडळीने या पुलाची मागणी का केली नाही, यांचे उत्तर मात्र सापडत नाही.