गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांकडून सुटका Pudhari Photo
रायगड

गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांकडून सुटका

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : गोवंशीय जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने एका वाहनात भरून जात असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजताच नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे.

नेरळ पूर्व परिसरातील साई मंदिर ते पेशवाई मार्गे दामत रस्त्यावर नेरळ पोलिसांनी ही कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले असून, यामधे त्रासदायक अवस्थेत तीन गोवंशीय जातीची जनावरे पोलिसांना सापडून आली आहेत. यामधे नेरळ पोलिसांनी दामत गावातील वय वर्ष 35, याकूब रफिक आढाळ याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नेरळ पोलिसांनी मंगळवार 24 सप्टेंबर रोजी नेरळ पूर्व परिसरात चोरी करून गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समजताच नेरळ पोलिसांनी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास नेरळ पूर्व परिसरात साई मंदिर येथे आपला बंदोबस्त ठेवला होता. यावेळी एक सफेद रंगाचा मॅक्झिमो मोडेलचा टेम्पो संशयग्रस्त अवस्थेत दिसून असल्याने, त्या टेम्पो चालकाला पोलिसांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले परंतु चालकाने भरधाव वेगात वाहन साई मंदिर पेशवाई मार्गे दामत दिशेने घेऊन जात असताना, नेरळ पोलिसांनी सदर सफेद रंगाचा मॅक्झिमो मोडेलचा टेम्पो पकडला असता या टेम्पोमध्ये काळ्या रंगाची तीन गोवंशीय जातीची जनावरे त्रासदायक अवस्थेत पोलिसांना सापडून आली. तर या कारवाई मध्ये 50 हजार किंमतीची तीन गोवंशीय जातीची जनावरे सोबत दोन लाख किमतीचा टेम्पो असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही जनावरे चोरी करून आणल्याचे समोर आले असल्याने, नेरळ पोलिसांनी दामत गावातील याकूब रफिक आढाळ, वय वर्ष 35 याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टेम्पोसह चालकाचा पळण्याचा प्रयत्न

मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास नेरळ पूर्व परिसरात साई मंदिर येथे एक सफेद रंगाचा टेम्पो संशयग्रस्त अवस्थेत दिसून असल्याने, त्या टेम्पो चालकाला पोलिसांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले परंतु चालकाने भरधाव वेगात वाहन साई मंदिर पेशवाई मार्गे दामत दिशेने घेऊन जात असताना, नेरळ पोलिसांनी सदर टेम्पोचा पाठलाग करून ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT