नाते (रायगड) : इलियास ढोकले
मागील आठ दिवसांपूर्वीपासूनच महाड शहराला पाणीपुरवठा होणार्या रायगड विभागातील कोथुर्डे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड सुरू करण्यात आला आहे, यामुळे आगामी पावसाळ्यापूर्वी महाडकर नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती युक्त संकेत प्राप्त होत आहेत.
या संदर्भात महाड नगर परिषदेने गेल्या चार दिवसात दोन वेळा दवंडीद्वारे नागरिकांना या संदर्भातील सद्यस्थिती अवगत केली आहे. महाड शहराला नगरपालिकेच्या मालकीच्या कुर्ला धरणासह एमआयडीसी व रायगड विभागातील कोथुर्डे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.
यापैकी एमआयडीसी च्या पाणीपुरवठा होणार्या यंत्रणेत तांत्रिक निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी आठ दिवसापूर्वीच एमआयडीसी कडून एक दिवसात पाणीपुरवठा करण्याबाबतचे सुतवाची करण्यात आले होते काल कोथुर्डे धरणाबाबतही नगरपालिका प्रशासनाने या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे जाहीर करून नागरिकांच्या संकटामध्ये अधिक भर घातल्याचे प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रविवारी (दि.13) रोजी दुपारनंतर या संदर्भात महाड शहरांमध्ये देण्यात आलेल्या नगरपालिकेच्या दवंडीद्वारे शहराच्या विविध भागात होणार्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
दैनिक पुढारीने यापूर्वीच या दोन्ही ठिकाणच्या पाणीपुरवठ्यामध्ये देणार्या पाणीसाठ्याबाबत दोन्ही प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय राहिल्यासच मे अखेरीस पर्यंत योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होऊ शकेल अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते, मात्र त्या पश्चातही कोथुर्डे धरणाबाबत नगरपालिका प्रशासन व संबंधित यंत्रणांशी समन्वय राहिला नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे एकूणच महाडकर नागरिकांना एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासूनच चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन देखील धरण क्षेत्रातील पाणीसाठा बाबत घेण्यात न आलेल्या काळजीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे स्पष्ट संकेत पालिकेनेच घोषित केलेल्या या संदर्भातील दवंडीमुळे दिसून येत आहे.
कोतुर्डे धरणातील पाण्यावर महाड शहरा प्रमाणे या परिसरातील केंबुर्ली, दासगाव, वहूर, मोहोप्रे, गांधारपा ले, लाडवली, नाते, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव खु, नांदगाव बु, करंजखोल, तेटघर, कोकरे, आचलोळी, इत्यादी गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. यंदा या धरणाच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे या 22 गावांना पाणीटंचाईची झळ. जाणवणार असल्या ने त्यांना देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासनाला करावा लागणार आहे. यंदा पावसाचे पर्जन्यमापन कमी झाल्याने तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात झाल्याने धरणा माधील पाणी कमी झाला.