नेरळ : माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हदीतील मुख्य प्रवेश द्वाराजवळील दस्तुरी येथील माथेरान भूखंड क्र.93 मध्ये गेली चार पिढ्यांपासून मालवाहतूक व प्रवासी घोडे शेड उभारून बांधत जात आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासना कडून प्रचंड पोलीस बंदोस्तामध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र माथेरान मधील मालवाहतूक व प्रवासी असे 400 घोडे बेघर झाले असुन, याचा फटका हा माथेरानमधील हॉटेल व्यववसायीक व पर्यटन हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मालवाहतूक घोडेवाले मात्र त्याच भूखंडामधील जागेच्या मागणीवर ठाम आहे. तर कार्यवाही दरम्यान आश्वपाल संघटनेच्या स्त्रियांचा कार्यवाही दरम्यान पशासनाला कडाडून विरोध केल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
माथेरानमध्ये सर्व मालवाहतूक घोडयांवरून जाते. हा व्यावसाय हा गेली चार पिढ्यांपासून करीत आहेत. चालक व मालक हे आपले घोडे हे तेव्हा पासून दस्तूरी नाका येथील कार पार्कींग येथील भूखंड क्र. 93 एकूण क्षेत्र 5.5 एकर असलेल्या महसुल विभागाची असलेल्या जागेत प्लास्टिक शेड बांधून त्या शेड मध्ये मालवाहतूक व प्रवासी घोडे बांधत आले आहेत. या भूखंडातील एक एकर जागेची मागणी ही दस्तूरी माथेरान आश्वपाल कल्याणकारी सामाजिक संस्था व माथेरान मुळनिवासी आश्वपाल संघटना यांच्या माध्यमातून प्रशासन स्तरावर वारंवार केली जात आहे.
येथे असलेले आदीचे वाहनतळ हे कमी पडते.त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या भूखंडामध्ये अतिरिक्त वाहानतळासाठी पुढे येणारी मागणीनुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुरुवारी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद स्तरावरून मोठया बंदोबस्तात मालवाहतूक व प्रवासी घोडे बांधणाऱ्या शेड तोडण्याची कारवाई करण्यात आली.
अश्वपाल संघटनेच्या स्त्रियांकडून प्रशासना विरोधात मोठय ा प्रमाणात आक्रोश व्यक्त करत कडकडून विरोध करण्यात आला. घोडयांचा असलेला निवारा हिरावून गेल्याने मात्र मालवाहतूक व प्रवासी एकूण 400 घोडे हे बेघर झाले आहे. निवारा हिरावून घेतल्याने या ऊन वारा पाऊस ऋतूमध्ये या घोड्यांच्या आरोग्यासह निवाऱ्याची मुख्य समस्या ही चव्हाट्यावर आली यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा खंडीत केला तर हॉटेल पर्यटक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अनधिकृत तबेले हटविले
माथेरान 93 हा प्लॉट वाहन पार्किंग आणि लॉजिस्टिक्स यासाठी राखीव ठेवला आहे.माथेरान येथे होणारी वाहतूक कोंडी यासाठी वारंवार तक्रारी येत होत्या.शिवाय जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही कारवाई केली आहे. येथील अनधिकृत घोडे तबेले हटवले आहेत. घोडे हे माथेरानचे अविभाज्य घटक आहे.घोड्यावरच माथेरान येथे जीवनावश्यक मालवाहतूक होते. त्यामुळे त्यांचाही विचार घेतला जाणार आहे यासाठी आम्ही मालवाहतूक घोडे चालक संघटनांकडून जागेची मागणी संदर्भात लेखी निवेदन मागण्यात आले आहेत.त्यांचा प्रस्ताव घेऊन,संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा मार्ग देखील निकाली काढणार आहोत,असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगीतले.
घोड्यांचा निवारा हिरावण्याचे काम मात्र माथेरान गीरिस्थान नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून केले गेले आहे. तरी आम्ही या भूखंडामध्ये जागा मिळण्याचे आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहे.राकेश चव्हाण, मालवाहतूक घोडे मालक