रायगड

Local body Election: महाड पंचायत समिती आरक्षणामध्येमध्ये 'महिला राज'

Mahad Panchayat Election latest news: सभापती पद ओबीसी महिलासाठी आरक्षित

पुढारी वृत्तसेवा

Local body Election Mahad Panchayat Committee latest news

महाड: पंचायत समितीच्या १० गणाच्या आरक्षणाची सोडत आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात सोडत पद्धतीने काढण्यात आली. यामध्ये ५ ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने अनेकांचे मनसुबे हवेत विरल्याचे चित्र यावेळी पाहण्यास मिळाले.

महाड पंचायत समितीच्या १० गणामध्ये आरक्षणाची सोडत महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये काढण्यात आली. या सोडतीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , आरपीआय गट. यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी या आरक्षण सोडते साठी राष्ट्रीय स्मारकांमध्ये सकाळपासूनच दाखल झाले होते.

प्रत्येकाला आपल्या पंचायत समिती गणामध्ये आपल्या बाजूने आरक्षण पडेल असेल वाटत असताना अनेकांना हे आरक्षणाने धक्का दिला आहे. तसेच महाड पंचायत समितीमधून मागील निवडणुकीत विजयी झालेल्या काहींच्या गणात आरक्षण झाल्याने नवीन इच्छुक उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे. महाड पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे;

  • १०५ धामणे पंचायत समिती गण - अनुसूचित जमातीसाठी राखीव

  • १०६ बिरवाडी पंचायत समिती गण - सर्वसाधारण वर्गासाठी

  • १०७ वरंध पंचायत समिती गण - महिला सर्वसाधारण

  • १०८ खरवली पंचायत समिती गण - ओबीसी महिला

  • १०९ नडगाव तर्फे बिरवाडी पंचायत समिती गण - महिला सर्वसाधारण

  • ११० नाते . पंचायत समिती गण - सर्वसाधारण

  • १११ दासगाव पंचायत समिती गण - ओबीसी सर्वसाधारण

  • ११२ अप्पर तुडील पंचायत समिती गण - महिला सर्वसाधारण

  • ११३ करंजाडी पंचायत समिती गण - सर्वसाधारण

  • ११४ विन्हेरे पंचायत समिती गण - महिला सर्वसाधारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT